काेराेना तपासणी साठी गोवा राज्याच्या धर्तीवर ‘ट्रु नेट’ मशिन खरेदी करणार- ना.उदय सामंत
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काेराेना तपासणी साठी गोवा राज्याच्या धर्तीवर ‘ट्रु नेट’ मशिन खरेदी करणार आहोत. जिल्हयासाठी प्रत्येकी एक मशिन असेल. जिल्हा रुग्णालयात ती बसविण्यात येणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली या मशिनचे वैशिष्ट्य असे आहे की मशीन निगेटिव्ह रिपोर्टच देते. त्यामुळे चाकरमान्याच्या तपासणी लवकर हाेतील तासाला ४ तपासण्या हाेऊ शकतील ज्याचे अहवाल निगेटिव्ह येतिल त्यांना हाेम काेराेन्टाइन करण्यात येईल .ज्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही, त्याचे स्वॅब घेऊन ते मिरजला पाठविले जातील. त्यात त्याचा अहवाल पाॅझेटिव्ह आला तर त्याना रुग्णालयात दाखल केले जाईल या मुळेअहवाल लवकर येऊन कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल
व लॅबवर ताण पडणार नाही आणि अहवालही लवकर मिळेल. येत्या आठ दिवसामध्ये ही मशिन येईल असेही सांमत यांनी सांगितले
www.konkantoday.com