रत्नागिरीत जिल्हयात काेराेनाचा दुसरा बळी,दापोली येथील महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू
रत्नागिरी शासकीय रुग्णालय म्हणजे कोरोना रुग्णालयात आज दापोली येथील ६५वर्षीय महिलेच्या उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला.ही रुग्ण महिला दापोली येथील होती आज सायंकाळी साडे सात वाजता श्वसन प्रक्रियेस त्रास झाल्याने तिचा मृत्यू झाला.सदर महिला कोरोना पॉझिटिव्ह होती.या महिलेची मुंबई सायन हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली होती.या महिलेस कोरोना असल्याने जे जे किंवा केईएम रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला होता.परंतु तिच्या नातेवाईकांनी तेथे दाखल न करता तिला खाजगी अॅम्बुलन्सने दापोली येथे आणले होते.दापोली येथे झालेल्या तपासणीत ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता त्यानंतर या महिलेचे रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.तिची प्रकृती क्रिटिकल होती तिचा आता मृत्यू झाला आहे.याधी खेडमध्ये कळंबणी येथील उप जिल्हा रुग्णालयात काेराेनाचा जिल्ह्यातील पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता.त्यामुळे आता जिल्ह्यात काेराेनाचे दोन बळी गेले आहेत
www.konkantoday.com