विशाखापट्टणममध्ये विषारी वायूची गळती, ८ जणांचा मृत्यू, शेकडो अस्वस्थ
विशाखापट्टणम शहराजवळच्या एका केमिकल कंपनीच्या प्लांटमधून विषारी वायूची गळती झाल्यामुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक अस्वस्थ आहेत. आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम शहराजवळ आर. आर. वेंकटापूरम परिसरात ही घटना गुरूवारी पहाटे घडली.
मृतांपैकी तीन मृतदेह कंपनीच्या प्लांटजवळ आढळून आले तर अस्वस्थ वाटत असल्यामुळे किंग जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
.पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसरातील पाच गावं रिकामी केली आहेत.
www.konkantoday.com