रत्नागिरीतील प्रसिद्ध व्यापारी घेवरचंद जैन यांच्या नेवरे येथील बागेला आग ,अडीच कोटींचे नुकसान
रत्नागिरीतील प्रसिद्ध व्यापारी घेवरचंद जैन यांच्या नेवरे येथील आंबा व काजूच्या बागेला काल सायंकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत जैन यांची २३०० आंबा कलमे व ७८५ काजू कलमे जळून गेल्याने त्यांचे सुमारे २ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या बागेच्या भागातून लाईटच्या वायर गेल्या होत्या त्याला स्पार्किंग झाल्याने ही आग लागली असा अंदाज आहे.हा प्रकार काल सायंकाळी साडेपाच वाजता घडला.आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या कर्मचारी गेले होते त्यानंतर आग विझवण्यात आली मात्र यामध्ये लागती कलमे जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com