
रत्नागिरी शहरातील सराफ दुकाने बंद ठेवण्याचा संघटनेचा निर्णय
सध्याच्या काेराेनाच्या परिस्थितीत रत्नागिरी शहरात गर्दी वाढून कोराेनाचा प्रसार होऊ नये म्हणून रत्नागिरी सराफ संघटनेने प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.आज सराफ संघटनेची ऑनलाइन मिटिंग घेण्यात आली यामध्ये रत्नागिरी शहरातील सराफ दुकाने लॉक डाउन संपेपर्यंत म्हणजे १७ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती सराफ संघटनेचे अध्यक्ष संतोष खेडेकर यांनी दिली आहे.
रत्नागिरी सराफ असोसिएशनचे
सर्व सभासद यांनी बहुमताने शासनाचे बंद ला समर्थन दिले ,गरजु बांधवांना मदतीचा हात दिला ,तस्सेच सर्व सेवा वारीयर्स चा अभिनंदनाचा ठराव केला व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ,एकमत झाले.
www.konkantoday.com