
रत्नागिरी जिल्ह्यात आज आणखी चार कोरोना बाधित रुग्ण सापडले
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे दोन व संगमेश्वर येथे दोन असे चार कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.एकाच दिवशी ४ रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.यातील २ रुग्ण दापोली वणवशी,शिरधे भागातील असून संगमेश्वर तालुक्यात सापडलेले २ रुग्ण हे मुरडव येथील महिला रुग्ण आहेत.या सर्वांना काेराेंटाईन करून ठेवण्यात आले होते वा त्यांचा अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते हे अहवाल पॉझिटिव आले आहेत.या सर्वांची हिस्ट्री मुंबई येथे जाऊन आल्याची आहे.
www.konkantoday.com