जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १७१ अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ५ कोरोना बाधीत रुग्ण असले तरी रत्नागिरी जिल्ह्य़ातून तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या स्वॅबचे गेल्या २४ तासात प्राप्त १७१ अहवाल निगेटिव्ह आले असल्याने जिल्हावासियांना थोडा दिलासा मिळाला आहे. अद्यापही (०५/०५/२०२० पाच वाजेपर्यंत) २२१ अहवाल प्रलंबित आहेत.जिल्हयात आत्तापर्यंत तपासणीसाठी घेण्यात आलेले नमुने – 1366,एकूण आलेले पॉझिटिव्ह अहवाल 11,एकूण आलेले निगेटिव्ह अहवाल 1132,नाकारलेल्या स्वबची संख्या 2 अशी आहे.
www.konkantoday.com