चिर्याचा ट्रक उलटून हौद्यात बसलेल्या महिलेचा मृत्यू
दापाेली तालुक्यातील माटवण येथे चिरेचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ट्रकच्या हौद्यात बसलेल्या गंगुबाई रूपमपुर महिलेच्या अंगावर चिरे पडून तिचा मृत्यू झाला. हा अपघात झाला.ट्रक चालक विशाल कालेकर हे आपल्या ताब्यातील ट्रकमध्ये बोडीवली येथील चिरेखाणीवरून चिरे भरून कामगारांना घेऊन नारायण येथे चिरे खाली करण्यासाठी जात होते.
सकाळी १०.३० च्या सुमारास त्यांची गाडी माटवण मोरेवाडी येथे आली असता, अचानक चालकाच्या बाजूचा रस्ता खचल्याने ट्रक चालकाच्या बाजूने उलटला.यावेळी ट्रकच्या हौद्यात बसलेल्या गंगुबाई रूपमपुर (४२) यांच्या
अंगावर चिरे पडून त्या गंभीर जखमी झाल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूप्रकरणी चालक विशाल कालेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com