कोरोनामुळे अहमदाबाद मार्केटमधील कामकाज थंडचा कोकण रेल्वेच्या पार्सल ट्रेनला बसला फटका

कोकणातील हापूस गुजरातसह विविध भागात पोचवण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाकडून ओखा ते विरुवअनंतपुरम अशी स्पेशल पार्सल ट्रेन सोडण्यात आली. या गाडीच्या दोन फेर्‍या झाल्या. पहिल्या फेरीप्रमाणेच दुसर्‍या फेरीतून खाद्यपदाथ्थ औषध साठा ओखा येथून कोकणासह दक्षिणेकडील भागांकडे आला. परतीच्या प्रवासात अधिकाधिक हापूसच्या पेट्या पाठवल्या जातील अशी अपेक्षा होती; परंतु ती फोल ठरली. केरळमधून मासळी, बनाना चिप्स रत्नागिरीत आणल्या गेल्या. कणकवलीतून २५पेटी, राजापूरमधून २५पेटी तर रत्नागिरीतून २२५पेटी हापूस जामनगर, अहमदाबाद, राजकोटला पाठविण्यात आला. या गाडीला सामानाचे पाच डबे जोडण्यात आले होते. दुसरी फेरी सुटली त्याचवेळी कोरोनामुळे अहमदाबाद मार्केटमधील कामकाज थंड पडले होते. परिणामी काही व्यापार्‍यांनी कोकणातील शेतकर्‍यांना आंबा पाठवू नका अशा सुचना दिल्या होत्या. त्याचा फटका रेल्वे पार्सल गाडीला बसला आहे. काही पेटींच्या ऑर्डरही रद्द केल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आली.
आंबा रेल्वेने पाठविताना शेतकर्‍यांना खटाटोप करावा लागताे असे काही बागायतदारांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button