पंतप्रधानपदावरील व्यक्तीने आपल्या राज्याचा नव्हे, तर देशाचा व्यापक विचार केला पाहिजे–शरद पवार
मुंबईचा चेहरामोहरा पूर्वी औद्योगिक होता व गेल्या काही वर्षांत हे शहर वित्तीय सेवांचे केंद्र झाल्याने आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईहून गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय झाला, हे योग्य नाही. यामुळे आम्ही अस्वस्थ आहोत. पंतप्रधानपदावरील व्यक्तीने आपल्या राज्याचा नव्हे, तर देशाचा व्यापक विचार केला पाहिजे, अशी टीका करत या निर्णयाचा फेरविचार करून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईत व्हावे असा आग्रह आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धरू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी
म्हटले आहे
www.konkantoday.com