
जिल्हा प्रशासनाने रत्नागिरी जिल्ह्यातील दुकाने उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही
केंद्र शासनाने काल रात्री काही अटी घालून अन्य प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती यामध्ये दुकानातील कर्मचाऱ्यांची संख्या पन्नास टक्के व कर्मचार्यानी मास्क व ग्लोज घालण्याच्या अटी घालण्यात आल्या होत्या केंद्रानेहा निर्णय जाहीर केले असले तरी महाराष्ट्र शासनाने अद्याप याबाबत दुकाने उघडण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील दुकानदारांच्या संघटनेही जो पर्यंत राज्य शासनाकडून निर्णय होत नाही तोपर्यंत दुकाने न उघडण्याचा निर्णय जाहीर केला होता
रत्नागिरी जिल्ह्यातही अद्याप दुकाने उघडण्याबाबत बाबत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे सध्या तरी रत्नागिरीत दुकाने बंद राहणार आहेत याबाबत राज्य शासन कोणती भूमिका घेणार याकडे व्यापाऱयांचे लक्ष लागले आहे
www.konkantoday.com