संगमेश्वर मुचरी येथे सर्पदंश झाल्याने महिलेचा मृत्यू
मुंबईहून गावी आलेल्या साै.संपदा संदीप यादव या महिलेचा सर्पाने दंश केल्याने मृत्यू झाला ही घटना संगमेश्वर तालुक्यातील मुचरी भाताडेवाडी येथे घडली.संपदा ही मुंबई येथे राहत होती ती नुकतीच गावी मुचरी येथे आली होती
ती रात्राै साडेआठ वाजता घराच्या मागे असलेल्या संडासमध्ये जाण्यासाठी पडवी मधून खाली उतरत असताना पायरी जवळ असलेल्या सापाने तिच्या डाव्या पायाला दंश केला तिला उपचारासाठी तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले परंतु तोपर्यंत ती मयत झाली होती.
www.konkantoday.com