रत्नागिरी जिल्ह्यातील आत्तापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा नेमका आकडा सहाच जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण
काही राष्ट्रीय माध्यम तसेच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा काल आठ दाखवण्यात आला होता.मात्र रत्नागिरी जिल्हयात आकडा अधिकृतपणे 6 असाच आहे.मुंबईतील कांदिवली वेस्ट भागात राहणारी एक 26 वर्षीय तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. प्रत्यक्षात ती 2 वर्षापासून तेथे राहत असली तरी नाव नोंदवताना मुळ पत्ता देवरुख संगमेश्वर असा नोंदला आहे.२४ वर्षीय तरुण रमाबाई आंबेडकर नगर वरळी येथे 10 वर्षापासून राहतो. तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला त्याचा मुळ पत्ता रत्नागिरी जवळील फुणगुस गावचा नोंदला आहे. या दोन नावांमुळे राज्यस्तरावर जारी आकडेवारीत रत्नागिरीचा आकडा 8 पॉझिटिव्ह दाखवला गेलेला आहे.रत्नागिरी जिल्हयात आकडा अधिकृतपणे 6 असाच आहे.असे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.
www.konkantoday.com