चिपळूण तालुक्यातील वाघिवरे येथिल दोन युवकांचा बुडून मृत्यू
चिपळूण तालुक्यातील वाघिवरे येथील झावरी नदीच्या पात्रात रुमानी बंदराजवळ आंघोळीसाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.उमेर यासीन मुकादम (१७) व दाऊद अब्दुल साबळे (१५, दोघेही रा.वाघिवरे मोहल्ला) हे दोघे जण नदीवर आंघोळीसाठी गेले होते. अशातच पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघेही बुडाले
www.konkantoday.com