अत्यावश्यक सेवेसाठी गेलेले
एसटीचे कर्मचारी होम क्वारंटाईन
लॉकडाऊनच्या काळात राजापूर आगारातुन चार एसटीचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत गेले होते. मात्र ते पुन्हा परत आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईनही करण्यात आले
तर अत्यावश्यक सेवेतील एक पोलीस कर्मचारी हा अत्यंत महत्वाच्या कामासाठी राजापूरातुन कोल्हापूरात गेला होता, त्याने सर्व खबरदारी घेतली होती. मात्र तो राजापूरात परत येताच त्याला आरोग्य विभागाकडून संस्थात्मक विलिगीकरणात दाखल करण्यात आले आहे.असे असले तरी परजिल्हयातील आंबा व्यावसायिक आणि त्यांचे कर्मचारी, अत्यावश्यक सेवा म्हणून परजिल्हयातुन येणारे दुध आणि भाजी विक्रेते यांचा तालुक्यात शहरात आणि ग्रामीण भागात मुक्त संचार सुरू आहे मात्र त्याची आरोग्य तपासणी हाेत
नाही.
www.konkantoday.com