फक्त नवरा, नवरी ,करवली व भटजींच्या उपस्थितीत पार पडला दापोली कोळबांद्रे येथे विवाह सोहळा

0
659

कोणाचाही विवाह सोहळा म्हणजे आनंदाचा क्षण पाहुण्यांची सरबराई त्यामुळे विवाहाचे तीन चार दिवसमोठ्यांपासून लहानांपर्यंत उत्साह संचारलेला असतो सध्या काेराेनाच्या परिस्थितीमुळे शासनाने विवाह सोहळे या काळात टाळावेत अन्यथा अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करावे असे सांगितले आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष करून अनेक विवाह सोहळेमोठ्या उपस्थितीत पार पडल्यामुळे प्रशासनाने अनेकांवर कारवाईचा बडगाही उगारला आहे मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कोळबांद्रे कातळवाडी येथील पार पडलेला विवाह सर्वांना आदर्श ठरेल असाच होता वास्तविक हा विवाह सोहळा आधीच ठरला होता विवाह थाटात करण्याचेही ठरले होते मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे त्यावर बंधने आल्याने हा विवाह सोहळा अगदी साध्या वातावरणात पार पडला लग्नासाठी मंडपात जास्त सजावट नाही ,ना लाऊडस्पीकर, बेंडबाजा चाही पत्ता नाही दोन्ही घरातील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला नवरा मुलगा ,नवरी मुलगी ,करवली आणि भटजी अगदी मास्क लावून मंडपात आले भटजीनी तोंडाला मास्क लावूनच मंगलाष्टक म्हटली नवरा आणि नवरीने सुरक्षित अंतरावरूनच एकमेकांच्या गळ्यात हार घातले व हा आगळावेगळा विवाह सोहळा पार पडला अर्थात लग्नाचा होणारी गोडाधोडाचे जेवणावळ चुकल्यामुळे गावकरी जरा नाराज झाले असले तरी हा विवाह आता गावात चर्चेचा विषय आहे.सदर विवाह हितचिंतक सेवा मंडळ खोंडे-चिंचवाडी कोळबांद्रे या मंडळाच्यावतीने पार पडला.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here