अवकाळी पावसाच्या दणक्याने चौपदरीकरणाच्या कामाचे निघाले वाभाडे
कोकणवासीयांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मुंबई गोवा चौपदरीकरणाचे काम मध्यंतरी निधीअभावी आता कोराेनाचा संकटामुळे अनेक भागात ठप्प झाले आहे. चिपळूण तालुक्यात पेढे परशुराम भाग वगळता चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली होती. त्यामध्ये आजूबाजूच्या डोंगरांचे कटिंग करणे व सपाटीकरण करणे ही कामे काही महिन्यांपूर्वी चालू झाली होती काल चिपळूण परिसरात अचानक अवकाळी वादळी पाऊस पडला त्यामुळे हा सर्व भाग व रस्ता चिखलमय झाला. माती रस्त्यावर आल्याने या चिखलमय रस्त्यावरून वाहने हाकणे धोक्याचे झाले होते. यामुळे येत्या काही दिवसांत या कामाला वेग आला नाही तर पावसाळ्यात कोकणवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
www.konkantoday.com