
लांजा येथे शिवभोजन थाळी योजनेचा आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांच्या हस्ते शुभारंभ
महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी शिवभोजन थाळी योजनेच्या शुभारंभ राजापूर- लांजा- साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजनजी साळवी हस्ते लांजा शहर येथील कोर्ले तिठा येथील हॉटेल आनंदी येथे करण्यात आला. यावेळी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांनी त्याप्रसंगी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात टाळेबंदी केली असून सर्व व्यवहार व कामकाज ठप्प आहे, त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरजू गरीब लोकांचे हाल होऊ नये यासाठी मा. शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रात कुणीही उपाशी राहणार नाही असा संकल्प करून राज्यभरातील रेशन दुकानात मोफत धान्य वाटप व शिवभोजन थाळी च्या माध्यमातून फक्त ५ रुपयामध्ये जेवण अशा योजना सुरू केल्या आहेत.या योजनेचा लाभ दुपारी ११ ते ३या वेळेत लांजा शहर व परिसरातील गरीब मजूर व हातावर पोट असणाऱ्या गरजूनी घ्यावा असे आवाहन केले त्याप्रसंगी तहसिलदार वनिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्ष मनोहर बाईत, सभापती सौ लीला घडशी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बापू जाधव, उप तालुकाप्रमुख सुरेश करंबळे, गट विकास अधिकारी भांड, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत मंचेकर, उप विभागप्रमुख विश्वास मांडवकर, नगरसेवक राजू हळदणकर, लहू कांबळे, दुर्वा भाईशेट्ये, प्रसादभाई शेट्ये,सुभाष कुंभार, शमा तोडगे, लांजा पत्रकार मित्र व मान्यवर उपस्थित होते.
www.konkantoday.com