बंद अवस्थेत असलेले निरामय हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी
एनरॉनच्या दाभोळ पावर कंपनीने गुहागर तालुका व अन्य लगतच्या तालुक्यातील रुग्णांच्या सेवेसाठी उभारलेले अद्ययावत व सुसज्ज असे निरामय हॉस्पिटल गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत आहे. सध्या देशात कोरोना व्हायरस या महाभयंकर रोगाने थैमान घातले आहे. अशा या काळात तालुक्यातील व परिसरातील जनतेला अत्यावश्यक सेवेची गरज म्हणून हे हॉस्पिटल सुरू होणे अत्यंत गरजेचे असून आपण हे हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी कळकळीची विनंती शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड.संकेत साळवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
www.konkantoday.com