
ना.उदय सामंत यांनी राजिवडा आणि साखरतर येथे पहाणी करून आढावा घेतला
राजीवडा आणि साखरतर येथे कोरोना बाधित रुग्ण आढळुन आले असल्याने प्रशासनाने या दोन्ही भागात सभोवतालचा तीन किलोमीटरचा परिसर सील केला आहे.या परिसरात जंतू नाशक फवारणी करून आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करुन आवश्यक त्या सूचना देत आहेत तर पोलीस यंत्रणा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत आहेत.आज मंत्री महोदयांनी स्वतः या दोन्ही ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पहाणी करत ग्रामस्थांना प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच या परिसरात काम करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचे मनोबल वाढविले.
www.konkantoday.com