
आधी निधी व आता काेराेनामुळे मुंबई गाेवा महामार्गचे काम ठप्प
आधि निधी अभावी मुंबई गाेवा महामार्गाचे काम रखडलेले हाेते त्यातच आता
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. यात महामार्ग चौपदरीकरणाचेही काम ठप्प झालेआहे. महामार्ग विभाग पुन्हा काम सुरू करण्याचे पत्र देत नाही तोपर्यंत चौपदरीकरणाची कामे सुरू करता येत नसल्याचे ठेकेदारचे म्हणणे आहे. सद्यःस्थितीत महामार्ग, उड्डाणपूल, नद्यांवरील पूल आणि सर्व्हिस रोडची कामे ठप्प आहेत. लॉकडाउनमुळे मे अखेरपर्यंत चौपदरीकरण पूर्णत्वाचीही शक्यता मावळली आहे.
www.konkantoday.com