मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतःच गाडी चालवत मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतःच गाडी चालवत ‘मातोश्री’हून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना झाले. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत ते गाडीत एकटेच होते, तर ‘कोरोना’पासून बचावासाठी त्यांनी चेहऱ्याला मास्कही लावला होता.सरकारची मर्सिडीज टाळून उद्धव ठाकरे यांनी स्वतःची गाडी वापरली. दोन आठवड्यापूर्वीही उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत बैठकीला गेले होते. त्यावेळी त्यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मागच्या सीटवर बसले होते, यावेळी मात्र मुख्यमंत्री गाडीने एकटेच गेले.
www.konkantoday.com