तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मल्टिपर्पज लॅब विद्यापीठांमध्ये सुरू करण्याच्या सूचना
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकृषिक विद्यापीठांमध्ये विविध प्रकारच्या आजारांसंदर्भातील चाचण्या घेता येतील अशा मल्टिपर्पज लॅब विद्यापीठांमध्ये सुरू करण्याच्या सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्या.नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने अशा प्रकारची लॅब सुरू केली आहे. त्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील इतर विद्यापीठांनी आपल्याकडे अशा प्रकारच्या लॅब सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व परवानग्या देण्यात येतील, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.
www.konkantoday.com