आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने तबलिगी धर्मगुरूंची बैठक
दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन मरकजसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तबलिगी बांधवांनी पोलिस, प्रशासन आणि आरोग्य विभागाला सहकार्याचे आवाहन करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुढाकार घेऊन या समाजाच्या धर्मगुरुंची बैठक घेतली.
यावेळी तबलिगी धर्मगुरूंनी आरोग्यमंत्रांच्या उपस्थितीत समाजातील बांधवांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करतानाच माणुसकी आणि देशहीत जपत जातीय सलोखा कायम राखण्याचे आवाहन केले आहे. मरकजमध्ये सहभागी झालेले राज्यातील तबलीगी बांधव स्वत:हून प्रशासनकडे जाऊन संपर्क साधतील अशी ग्वाहीही या धर्मगुरूंनी यावेळी आरोग्यमंत्र्यांना दिली.
www.konkantoday.com