रत्नागिरीतील राजीवडा भागांमध्ये पोलिसांनी संचलन करून केली नागरिकांना घराबाहेर न पडण्याची सूचना
रत्नागिरी शहरातील राजिवडा भागात कोराेनाचा रुग्ण सापडल्याने प्रशासनाने हा संपूर्ण परिसर सील केला आहे.प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे या भागातील नागरिकांनी घराबाहेर येऊ नये तसेच या भागातून कोणी स्थलांतरित होऊ नये व या भागात कोणी येऊ नये म्हणून सक्त सूचना केल्या आहेत.असे असतानाही काही नागरिक घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत.काल खाडीत मच्छिमारी करणाऱ्या सहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी या भागात संचलन केले.यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड , उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे ,शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड व पोलीस मोठय़ासंख्येने उपस्थित होते.यावेळी नागरिकांना पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी मार्गदर्शन केले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये त्यांना जीवनाश्यक सर्व वस्तूंचा पुरवठा केला जाईल नागरिकांनी घरातील वृद्ध अन्य छोट्या मुलांची काळजी घ्यावी अगदीच अत्यावश्यक असेल तर घरातील एकट्या तरुणांनेच बाहेर पडावे. गावातील सर्व मेडिकल स्टोअर उघडे असून रुग्णाला रुग्णालयात नेण्याची आवश्यकता असल्यास गाडी व रिक्षाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच गावाच्या पाणीपुरवठ्याची वेळही वाढविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे नागरिकांनी घरा बाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com