शहराबरोबर ग्रामीण भागातही होम डिलिव्हरी सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी सरपंचांशी संपर्क सुरू आहे. कोणत्याही पक्षाचे लेबल न लावता सर्वांना बरोबर घेऊन ही सुविधा जनतेला दिली जाणार आहे. शिवभोजन थाळीचे उद्दीष्ट देखील तिप्पट वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे आणि सीमेवर लॉक केलेले तसेच कंपन्या बंद पडल्यामुळे उपासमारीची वेळ आलेल्यांना त्याचा फायदा होईल. महिला बचतगटांना हे काम देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बाहेरून आलेल्या लोकासाठी सेंटर कॅम्प तयार करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी त्यांची सर्व व्यवस्था केली जाणार आहे
www.konkantoday.com