काहींना पोलिसी खाक्या दाखवत तर काहींना हात जोडून विनंती करत रस्त्यावर न येण्याचे पोलिसांचे आवाहन
राज्यात कोराेनाचा विळखा वाढत असून मुंबईत आज एका दिवसात ५९ नव्याने रुग्ण सापडले आहेत महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा तीनशेच्या वर गेला आहे शासनाने संचारबंदी लागू केली आहे शासन नागरिकांना वारंवार रस्त्यावर येऊ नका असे आवाहन करीत आहे तरी देखील नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत आहेत रत्नागिरी शहरात सकाळी मॉर्निंग वॉक करण्यापासून ,पायी चालत जाणारे व दुचाकी यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होती अनेक रस्त्यांवर महिलाही दिसून आल्या वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभुते व त्यांचे कर्मचारी मारुती मंदिर येथे ठाण मांडून होते काही कारणांमुळे रस्त्यावर आलेल्या महिलांना त्यानी अगदीहात जोडून विनंती केली कि आपण घराबाहेर पडू नका ,रस्त्यावर येऊ नका सरकार सांगते ते ऐका तुमच्या हिताचेच आहे .तर दुसरीकडे मात्र पोलिसी खाक्या दाखवत अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई केली अनेक दुचाकीची हवा काढण्यात आली तर काही गाड्या लॉक करून ठेवण्यात आल्या .जनतेने गांभीर्य ओळखून रस्त्यावर येऊ नये असे पोलीस वारंवार आवाहन करीत आहेत
www.konkantoday.com