जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर ठराविक वेळातच दुचाकीवाहनाना मिळणार इंधन
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर सर्व प्रकारची तीनचाकी वाहने, हलकी वाहने,मध्यम वजनाची वाहने,जड वाहतुकीचे वाहने यांचा प्रवासी व मालवाहतूक यासाठी पेट्रोल व डिझेल देण्यास आज २३ पासून पुढील आदेश होईपर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे.या आदेशामधून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे.तसेच सर्व प्रकारच्या दुचाकींना सकाळी १० ते दुपारी १ व दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेतच इंधन देण्याचे आदेश पेट्रोल पंपचालकांना देण्यात आले आहेत.
www.konkantoday.com