
खबरदारी म्हणून आणखी दोन रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल आणखी दोन रुग्ण आपणहून दाखल झाले आहेत यातील एक रुग्ण गुहागर शृंगारतळी येथील असून तो काही दिवसांपूर्वी दुबईतून परतला होता तर दुसरा रुग्ण कुवारबाव परिसरातील आहे यांना सर्दी खोकला सारखे लक्षण असल्याने ते आपणहून दाखल झाले आहेत त्यामुळे दोन दिवसांत सात संशयित रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल असून या सर्वांचे थुकीचे व अन्य नमुने पुणे येथे पाठविण्यात येत आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यानी दिली आहे
www.konkantoday.com