कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणपतीपुळे मंदिर आणि पावस येथील स्वामी स्वरुपानंद मंदिर दर्शनासाठी बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गणपतीपुळे मंदिर आणि पावस येथील स्वामी स्वरुपानंद मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहेगेल्या दोन दिवसांमध्ये गणपतीपुळेत येथे दोन ते तीन हजार पर्यटक दाखल झाले होते. एकाचवेळी एवढी लोकं एकत्र येणे हे सध्या पसरत असलेल्या साथीच्या पार्श्वभूमीवर योग्य नाही.. हे लक्षात घेऊनच गणपतीपुळे मंदिर व्यवस्थापनाकडून पुढील आदेश होईपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार श्री क्षेत्र पावस येथील स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर 17 मार्चपासून पुढील आदेश होईपर्यंत अनिश्चित काळासाठी बंद ठेवले आहे. भक्तनिवास धर्मशाळा येथे कोणीही सहल घेऊन येऊ नये असे आवाहनही पावस येथील मंदिर व्यवस्थापनातर्फे केले आहे.
www.konkantoday.com