मनोरूग्ण मुलीवर अत्याचार, सखोल चौकशीचे आदेश
मनोरूग्ण अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या प्रकरणामध्ये मनोरूग्णालयातील शिपायांकडे संशयाची सुई होती. मात्र मनोरूग्णालयाने त्या मुलीला उपचारानंतर दोन महिन्यांपूर्वीच डिस्चार्ज दिला होता. त्यानंतर ती लांजा येथील एका संस्थेत होती. लांजा संस्थेतून ती नुकतीच रत्नागिरी शहरातील एका संस्थेत दाखल झाली होती. त्यामुळे आता संशयाची सुई लांज्याकडे वळली आहे. या प्रकरणी मुलीची वैद्यकीय तपासणी झाली असून पीडीत मुलगी दोन महन्यांची गरोदर आहे.
याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी म्हणून रत्नागिरी जिल्हा महिला कॉंग्रेस कमिटीकडून अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. बोल्डे यांच्यासह अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार यांना निवेदन दिले. संबंधित पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला पाहिजे. यादृष्टीने पारदर्शकपणे तपास व्हावा, यासाठी लक्ष घालण्याची मागणी कॉंग्रेस कमिटीच्यावतीने रूपाली सावंत, ऍड. अश्विनी आगाशे, डॉ. स्नेहा पिलणकर यांनी केली आहे.
www.konkantoday.com