टिकटॉकचा नाद तरुणाच्या अंगाशी, माफी मागितल्याने प्रकरण मिटले
टिक टॉक वर काहीतरी वेगळे व्हिडिओ बनविण्याचे फॅड सध्या जोरात आहे चिपळूण येथे एका तरुणाने मद्याच्या बाटल्या समोर गाणे वाजवून टिक टॉक चा व्हिडिओ तयार केला मात्र वापरण्यात आलेले गाणे हे एका महापुरुषांवर आधारित असल्याने त्याच्या अनुयायांनी थेट पोलिस स्टेशनला धडक मारली व तरुणांवर कारवाईची मागणी केली पोलिसांनी तात्काळ त्या तरुणाला बोलवून घेऊन त्याची चांगलीच हजेरी घेतली शेवटी या तरुणाने झालेली चूक कबुल करून सर्वांसमोर जाहीर माफी मागितली आणि पोलिस स्टेशनमध्ये दोन तास चाललेले हे नाट्य संपुष्टात आले
www.konkantoday.com