
कोकण विभागात कोरोना विषयी प्रतिबंधात्मक उपाय योजना
— महसूल आयुक्त शिवाजी दौंड
कोकण विभागात कोरोना विषाणूजन्य आजाराबाबत शासकीय पातळीवर सर्व यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले आहे. जनतेने आवश्यक काळजी घेऊन स्वत:चे आरोग्य चांगले ठेवावे असे आवाहन कोकण विभागीय महसूल आयुक्त श्री.शिवाजी दौड यांनी पत्रकार परिषदेत केले. जिल्हा पातळीवर स्वतंत्र कक्ष हे जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्तरावर कार्यान्वित करण्यात आले आहेत. कोकणातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांचा बैठका घेऊन खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पी.पी.इ.किट्स आणि एन-95 मास्कची विक्री औषध दुकानातुन केली जाते. या मास्कची मुळ किंमती पेक्षा जास्त आकारणी होत असल्याचे व अनावश्यक खरेदी करून साठा होत असल्याचे निर्देशनास आल्यास तशी तक्रार शासनाकडे करावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असेही श्री.दौड म्हणाले.
कोकण विभागात मुंबई शहर, उपनगरासह पाचही जिल्हयात तपासणी पथके, स्कॅनिंगची सोय करण्यात आली आहे. विमानतळ, बंदरे, जेएनपीटी, मेरीटाईम बोर्ड यांच्या मदतीने बाहेरहून येणा-या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत 87 हजार प्रवाशांची स्कॅनिंग करण्यात आली आहे. कोकणातील जनतेने होळी उत्सव साजरा करताना काळजी घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी एकत्र येणे टाळावे. सर्व सामान्य जनतेला मास्क घालण्याची आवश्यकता नाही असेही स्पष्ट केले.
www.konkantoday.com