स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी जिल्हाधिकारी यांची बदली केल्याने जनतेचे मोठे नुकसान आमदार भास्कर जाधव यांचा गंभीर आरोप

0
91

रत्नागिरीचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बदली वैयक्तिक स्वार्थासाठी ज्यांनी कुणी केली आहे त्यांनी रत्नागिरी व येथील जनतेचे मोठे नुकसान केले असून एका कर्तव्यदक्ष मराठी अधिकार्याला घालवण्यात आले आहे असा गंभीर आरोप गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे हे सर्व प्रकरण आपण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यापर्यंत नेणार असल्याचे त्यानी सांगितले सुनील चव्हाण यांच्या रूपाने रत्नागिरी जिल्ह्याला कार्यक्षम अभ्यासू मराठी अधिकारी मिळाला होता सर्वसामान्य जनतेशी मिळून मिसळून वागण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे ते लोकप्रिय झाले होते कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच चव्हाण यांना येथून घालविण्यामागे कोणाचा तरी नक्की स्वार्थ आहे यामुळे जनतेच्या हितासाठी चव्हाण यांची बदली रद्द करावी अशी मागणी आपण करणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले आहे .
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here