शाश्वत मत्स्योद्योग विकास क्षेत्रामध्ये भारत आणि आइसलॅंड यांच्यामध्ये सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. दोन्ही देशांमध्ये हा करार गेल्या वर्षी 10 सप्टेंबर रोजी झाला होता.
खोल सागरामध्ये आणि इतर ठिकाणी मासे पकडण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आपल्याकडील ज्ञानाची देवाण-घेवाण करणे. तसेच मासेमारीसाठी योग्य स्थानावर विविध सुविधा निर्माण करणे. आधुनिक मत्स्यपालन, व्यवस्थापन आणि प्रक्रिया या क्षेत्रामध्ये मत्स्य व्यवसायातील लोकांना प्रशिक्षणा देण्याची व्यवस्था करणे.
मत्स्यपालन क्षेत्रातल्या शास्त्रीय शिक्षण आणि संशोधनाने मिळालेली माहिती आणि इतर सूचनांचे आदान-प्रदान करणे.आणि उद्योग म्हणून विकास करण्यासाठी खोल समुद्रातून मिळणाऱ्या मत्स्य उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी असलेल्या शक्‍यता तपासणे हा या सामंजस्य कराराचा प्रमुख उद्देश आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here