चीनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या खेड तालुक्यातील तीन विद्यार्थीनी अडकल्या
कोरोना व्हायरस सध्या चीनमध्ये धुमाकूळ घातला असून अनेक लोकांना विषाणूची लागण झाली आहे त्यात काही जणांना प्राण गमवावे लागले आहेत चीनने आयात निर्यातीवर बंदी घातली असून त्याचा फटका खेडमधील विद्यार्थिनीला बसला आहे त्या वैद्यकिय शिक्षणासाठी चीनमध्ये गेले आहेत चीनमधील नान टांग युनिव्हर्सिटीत त्या शिक्षण घेत आहेत सध्या या विद्यार्थी वसतिगृहात राहत असून व्हायरसच्या भितीमुळे त्या बाहेर पडू शकत नाहीत खेडमधील सुमेना हमदुले ,झोया हमदुले व सादिया हमदुले अशी विद्यार्थिनींची नावे आहेत त्यांनी भारतातील नातेवाइकांशी संपर्क साधला आहे त्यांची चीनमधून सुटका व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडे त्यांच्या पालकांनी संपर्क साधला आहे सध्या वसतिगृहावरील अन्नाचा साठा संपल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे या मुलींची सुटका व्हावी यासाठी भारतीय दुतावासामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत
www.konkantoday.com