
अपूर्ण नळपाणी योजना असताना देखील ठेकेदाराला बिल आदा ग्रामस्थांचा पंचायत समिती कार्यालयावर ठिय्या
राजापूर तालुक्यातील कोतापूर आग्रेवाडी येथील नळपाणी योजना अपूर्ण असताना देखील ती पूर्ण झाल्याचा खोटा फलक लावण्यात आला व संबंधित ठेकेदाराला चार लाख दहा हजाराचे बील अदा करण्यात आले. या योजनेमध्ये निविदेनुसार आरसीसी टाकी असताना सिंटेक्सची टाकी बसवून देखावा केला गेला व काम पूर्ण असल्याचा फलक लावून त्याचे बिल काढण्यात आले. प्रत्यक्षात काम अपूर्ण असून चार दिवस कोतापूर आग्रेवाडीतील सुमारे सव्वाशे ग्रामस्थांना पाणी न मिळाल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला व या ग्रामस्थांनी पं. स. कार्यालय गाठून दिवसभर आक्रमक ठिय्या आंदोलन छेडले. मंगळवारी भाजपा तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांच्या नेतृत्वाखाली कोतापूर आग्रेवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने पं. स. वर धडकले.
www.konkantoday.com