फिडे मानांकन राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईच्या मोहम्मद नुबेरशहा शेख याला विजेतेपद
येथील चेसमेन संस्थेने आयोजित केलेल्या आर. बी. सप्रे स्मृती फिडे मानांकन राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत मुंबईच्या मोहम्मद नुबेरशहा शेख याने ८.५ गुणांसह विजेतेपद पटकावले. पुण्याचा फिडेमास्टर निखिल दीक्षितने ८ गुणांसह उपविजेतेपद मिळवले. दैवज्ञ भवन येथे दोन दिवस स्पर्धा झाली.
.बालसुब्रह्मण्यमला ७.५ गुणांसह ११ हजार रुपयांचे तृतीय क्रमांकांचे पारितोषिक मिळाले.
पुष्कर डेरे याने कोल्हापूरच्या श्रीराज भोसले याचा पराभव केला. पुष्करने ७.५ गुणांसह ८ हजार रुपयांचे पारितोषिक व चौथे स्थान मिळवले. कोल्हापूरचा अनिश गांधीने पुण्याचा फिडेमास्टर अनिरुद्ध देशपांडेचा पराभव केला. त्याला ७.५ गुणांसह ६ हजार रुपयांचे पारितोषिक व सहावे स्थान मिळाले. अनिरुद्धला ३ हजार रुपयांचे पारितोषिक व सातवे स्थान मिळाले. नीलेश माळी व रत्नागिरीच्या ओम लामकाणे यांनी धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडवला. दोघांनाही ६.५ गुण मिळाले. ओमला बारावा, नीलेशला तेरावा क्रमांक मिळाला. मुंबईचा संजीव मिश्राने सोहम पवारचा पराभव करून ७ गुणांसह २५०० रुपयांचे पारितोषिक व आठवे स्थान मिळवले. ओम कदमने गोवर्धन वासवे याचा पराभव करून ७ गुणांसह नववे स्थान मिळवले. मुंबईच्या केतन बोरुचाने गोव्याच्या आर्यन रायकरचा पराभव करून ६.५ गुणांसह दहावे स्थान मिळवले.
उत्कृष्ट बिगरमानांकित- अनिकेत खेडेकर, दिया सवाल, सौरिश काशीळकर. उत्कृष्ट १५ वर्षांखालील- गुंजल चोपडेकर, ऋषीकेश परब, याहीन बोरुचा. उत्कृष्ट 13 वर्षांखालील- अरविंद अय्यर, हद्दीन महान, शुभेष सहस्रबुद्धे. उत्कृष्ट ९ वर्षांखालील- विराज राणे, शिवनाथ व्याम, सर्वेश दामले. उत्कृष्ट ७ वर्षांखालील- आरव पाटील, अर्णव पाटील, नभ मणिक.
रत्नागिरी जिल्हा- १५ वर्षांखालील- क्रिश डोईफोडे, ओंकार सावर्डेकर, अक्षय मयेकर, मुली- आदिती पाटील, युक्ता कांबळे, १३ वर्षांखालील मुली- सुमेधा मांगले, आरोही सावंत, ११ वर्षांखालील मुली- दिव्या पाटील, अस्मिता रॉय, ९ वर्षांखालील मुली- अशिना मोदी, ७ वर्षांखालील मुली- आरोही पाटील, शर्वरी पाटील, ज्येष्ठ खेळाडू- सुहास कामटेकर, दिलीप कुलकर्णी, प्रसाद मंजूनाथ. उत्कृष्ट महिला खेळाडू- तन्वी हडकोणकर, मुक्ताई देसाई व श्रेया दाईगडे.
अवधूत पटवर्धनने कोल्हापूरच्या आदित्य सावळकर याचा पराभव करून ७ गुणांसह १६०० ते १९०० रेटिंग गटात प्रथम क्रमांक पटकावला. चेसमेनचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत पावसकर यांचा पंच्याहत्तरीनिमित्त सत्कारही केला. जेएसडब्ल्यू जयगड पोर्टचे कॅप्टन रवी चंदेर, सुधीर तेलंग, केजीएन सरस्वती फाउंडेशनचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, चंद्रकांत हळबे, रश्मी चव्हाण, चेसमेनचे अध्यक्ष प्रसन्न आंबुलकर यांनी बक्षीस वितरण केले.
www.konkantoday.com