सक्षम भारतासाठी मुली, महिला शिकल्या पाहिजेत-रितू छाब्रिया

सक्षम महिला, सक्षम भारतासाठी मुली, महिला शिकल्या पाहिजेत. आरोग्य, शिक्षण, नर्सिंग, पॅरामेडिकल क्षेत्रात मुकुल माधव फाउंडेशन काम करते. त्याप्रमाणे दि यश फाउंडेशनही कार्यरत आहेत. आमची कोणाशीही स्पर्धा नाही. त्यामुळे दोन्ही संस्थांची पार्श्‍वभूमी पाहता एकत्र येऊन रत्नागिरीच्या विकासासाठी योगदान देऊया, असे प्रतिपादन मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्‍वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी केले.
रितू प्रकाश छाब्रिया रत्नागिरी दौर्‍यावर आल्या असता त्यांनी प्रथमच विमानतळासमोरील दि यश फाउंडेशन्सच्या नर्सिंग कॉलेजला भेट दिली. या प्रसंगी त्यांचे भारतीय पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आल्या. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
रितू छाब्रिया यांचा सत्कार दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त बाळासाहेब माने, सहव्यवस्थापकीय विश्‍वस्त सौ. माधवी माने यांनी केला. प्राचार्य डॉ. मिनाक्षी देवांगमठ, प्रा. चेतन अंबुपे, प्रा. रमेश बंडगर या वेळी उपस्थित होते.
रितू छाब्रिया म्हणाल्या, मी आरोग्य, शिक्षण, रत्नागिरी, मुंबई, पुण्यातील रुग्णालयांशी संबंधित काम करते. दोन्ही संस्थाची पार्श्‍वभूमी पाहता एकत्रित कार्यक्रम राबवता येतील. श्री. माने यांनी मुलींना चांगली संधी दिली आहे. महिलांचे सक्षमीकरण महत्त्वाचे आहे. चांगल्या कामाने त्या वरच्या पदावर पोहोचतील. सामान्य माणूस व देशासाठी आपण योगदान द्यायला हवे. नर्सिंग कॉलेजला आल्यावर मुलींची लक्षणीय संख्या पाहून आनंद वाटला. स्पर्धा करून विकास होत नाही तर एकमेकांच्या परस्पर सहकार्यातून विकास साधला जातो. फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी, मुकुल माधव विद्यालयाचा विस्तीर्ण परिसर आहे. त्याचप्रमाणे या नर्सिंग कॉलेजचाही मोठा परिसर आहे. या अनुषंगाने चांगले उपक्रम राबवता येतील.
बाळ माने म्हणाले, वडील यशवंतराव माने व आई शकुंतला माने यांच्या स्मरणार्थ नर्सिंग कॉलेजची स्थापना केली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button