नॅशनल मेडिकल्सने औषध क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला : आ. जगन्नाथ शिंदे

प्रशस्त जागा, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी वेगळी सकारात्मकता निर्माण करणारे वातावरण आणि रक्तातील साखर, वजन, प्रेशर तपासण्याची सुलभ सुविधा औषधालायमध्ये निर्माण करून नॅशनल मेडिकल्स ने औषध व्यवसाय क्षेत्रात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आ जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांनी केले.रत्नागिरी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वार्षिक बैठकीला रत्नागिरीत आलेल्या आ. आप्पा शिंदे यांनी आपल्या वेगळेपणासाठी चर्चेत असलेल्या नॅशनल मेडिकल्सच्या मारुती मंदिर येथील दुसऱ्या शाखेला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत संघटनेचे सहसचिव प्रसाद दानवे, खजिनदार वैजनाथ जागुष्टे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील पदाधिकारी उपस्थित होते. नॅशनल मेडिकलचे चंदनमल ओसवाल, भरत ओसवाल  आणि दिनेश ओसवाल यांनी आ. शिंदे व अन्य पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी आप्पा शिंदे यांनी संपूर्ण मेडिकल फिरून पाहिले आणि वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचे कौतुक केले. ते म्हणाले मेडिकलमध्ये सुरू असलेले संगीत, वेगवेगळ्या विभागांमुळे मॉलचा आलेला अनुभव, औषधांच्या ड्रॉवर ची नीट केलेली मांडणी, संगणकीय आणि बारकोडिंग तसेच विनम्र व तत्पर सेवा यामुळे ग्राहकाला जी सेवा हवी आहे ते समाधान इथे आल्यावर मिळते. तर फूड, कॉस्मेटिक्स ची अद्ययावत रेंज, स्वतंत्र बेबी केअर सेक्शन, जिम सप्लिमेंट्स यामुळे ग्राहकांना मेडिकल शॉपच्या माध्यमातून देण्यात देण्यात येणारी परिपूर्ण सेवा नॅशनल मेडिकल मध्ये देण्यात येत आहे. या मेडिकलचा आदर्श अन्य मेडिकल नि ठेवावा असे आवाहन यावेळी आ. अप्पा शिंदे यांनी केले. रत्नागिरीत नॅशनल मेडिकल्स गेली 33 वर्षे सेवा देत असून शहरातील मुख्य बस स्थानकावर पहिली शाखा गेली 33 वर्षे सुरू आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button