रत्नागिरीतील गुणी अभिनेत्री व उत्कृष्ट नृत्यांगणा सेजल मिलिंद कदम हीचे आज अकाली दुखद निधन झाले.सेजल हिला वीस दिवसांपूर्वी ब्लड कॅन्सरचे निदान झाले होते.तिच्यावर उपचार सुरू होते. रत्नागिरीतील पोलीस कर्मचारी मिलिंद कदम यांची ती मुलगी होती.सेजल ही अकरावीत शीकत होती.कमी वयात तिने चांगले यश संपादन केले होते.राजा सिंह बालनाट्यत तिची भूमिका सर्वांना भावली होती.तिच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याआधीच तिची अनपेक्षित एक्झिट झाली.तिच्या निधनाबद्दल राजा सिंह बालनाट्याचे निर्माती पूजा बावडेकर तसेच दिग्दर्शक प्रसिद्ध अभिनेते केतन शिरसागर यांनी दुःख व्यक्त केले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here