
नागरिकत्व कायदा नागरीकत्व देण्याचा आहे, काढून घेण्याचा नाही-चंद्रकांतदादा पाटील
मुस्लीम समाजामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतचे गैरसमज दूर करा. हा कायदा नागरीकत्व देण्याचा आहे, काढून घेण्याचा नाही. जगात 182 देशात नागरिकत्व नोंदणी कायदा आहे. देशातील 25 कोटी मुस्लीम जनतेने घाबरण्याचे कारण नाही. आपण बेकायदेशीर राहतो असे ज्यांना वाटते ते घाबरले आहेत. अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे संरक्षण होत नसल्याने अफगाणिस्तान, बांगलादेशमधील अल्पसंख्यांक लोकांना भारतात संधी मिळणार आहे, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी रत्नागिरीत बोलताना सांगितले.