ओशी गावामध्ये महिलासाठी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, जिल्हा शासकीय रुग्णालय, व महिला आर्थिक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी ओशी हरचिरी येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. या वेळेस उंच रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण, मौखिक आजार तपासणी, मानसिक आजार मार्गदर्शन , महिलांच्या स्तनाचे कॅन्सरची लक्षणे व उपचार मार्दर्शन यावेळेला महिलांना करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातर्फे डॉ. उत्तम कांबळे वैद्यकीय अधिकारी, एन सी डि विभाग, डॉ.मधुरा भागवत ,मानसिक आरोग्य विभाग , डॉ. गौरव पाटील , फिजिओथेरपिस्ट , स्टाफ नर्स प्राजक्ता जक्कर , श्री, आहेर , सामाजिक कार्यकर्त्या श्वेता चव्हाण उपष्ठीत होते.
डॉ.. उत्तम कांबळे यांनी स्तनाचे कॅन्सर ओळखण्याची पद्धत, उपचार, महिलांच्या आरोग्याबद्दल माहिती सांगितली. तसेच डॉ . मधुरा भागवत यांनी मानसिक आरोग्याबद्दल माहिती दिली तर डॉ गौरव पाटील यांनी सांधे दुखी व त्यावरील व्यायामाची माहिती दिली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या दीपाली देवरुखकर व वैशाली सॉलिम यांनी कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन केले. रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे व कार्यक्रम सहाय्यक विनोद गवाणकर यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापक केले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले . आरोग्य तपासणी कार्यक्रमासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .