रत्नागिरीतील थिबा पॅलेस येथे बंगला फोडून पावणे अकरा लाखांचा ऐवज लंपास
थिबा पॅलेस येथील समीर गुहागरकर यांचा बंद असलेला बंगला चोरटय़ाने फोडून सुमारे पावणे अकरा लाख रुपयांचे सोने चे दागिने व अन्य ऐवज चोरट्यांनी चोरून नेला रत्नागिरीतील एसटी कॉलनीजवळ थिबा पॅलेस रोडवर राहणारे समीर गुहागरकर हे मर्चंट नेव्हीमध्ये मध्ये कामाला आहेत ते सुट्टीनिमित्त रत्नागिरीत आले होते ते व त्यांचे सर्व कुटुंब हज यात्रेसाठी गेले होते त्या काळात अज्ञात चोरट्याने त्यांचा बंगला फाेडून घरात प्रवेश करून घरात कपाटात ठेवलेले सोन्याचे दागीने व अन्य अेवज चोरून नेला हज यात्रेनंतर परत आलेल्या गुहागरकर कुटुंबीयांनी बंगला उघडल्यावर बंगल्यात चोरी झाल्याचे दिसून आले याबाबत त्यांनी रत्नागिरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com