दापोली शहरात शासकीय जागेत अतिक्रमण, सोमवारपासून होणार कारवाई
कँम्प दापोली शहरातील शासकीय जागेत अतिक्रमण केलेल्या सरसकट अनधिकृत खोके धरकांवर होणार कारवाई होणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी पत्रकारांजवळ बोलताना दिली. शनिवारी दापोली नगरपंचायतीची तातडीची विशेष सर्वसाधारण सभा झाली गणसंख्येअभावी तहकूब झाली आहे. ही सभा आता १८ रोजी बुधवारी घेण्यात येणार आहे. तालुका प्रशासनाने सगळी सज्जता केली असून २०१४ पूर्वीच्या फेरीवाला धोरणाचा विचार करून न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात निकाल लागेपर्यंत काही अटीशर्तींवर भुई भाड्याने जागा देण्याचा निर्णय घेणे हा विषय १८ रोजी होणाऱ्या सभेत ठेवला जाणार आहे. या कारवाईची माहिती देणारी रिक्षाही शनिवारी दापोली शहरातून फिरवण्यात आली. प्रांताधिकारी शरद पवार यांचे तालुका प्रशासन कारवाईसाठी सज्ज झाले असून तहसीलदार समीर घारे,मुख्याधिकारी महादेव रोडगे,पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. पटेल आदी यंत्रणेला योग्य ते निर्देश देण्यात आले असून या कारवाईकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
www.konkantoday.com