अंतर्गत वादविवाद व मतभेद दूर झाले, नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार दीपक पटवर्धन यांना निवडून आणणार -माजी आमदार बाळ माने

भाजपमध्ये अंतर्गत असलेले मतभेद मिटले असून माजी आमदार बाळ माने व विद्यमान जिल्हाध्यक्ष यांच्या गटाचे आता मनोमिलन झाले आहे. पक्षात असलेले अंतर्गत वादविवाद व मतभिन्नता आता दूर झाली असल्याची कबुली माजी आमदार बाळ माने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यामुळे आता भाजपचे उमेदवार दीपक पटवर्धन यांना नगराध्यक्ष निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत गटबाजी मिटवण्यात यश आले असल्याने त्यांची बाजू आता भक्कम झाली आहे.
लोकशाही म्हटल्यावर थोडेफार मतभेद हे असू शकतात. तालुकाध्यक्ष निवड किंवा अन्य निर्णयावरून पक्षातील अंतर्गत मतभेद होते ते आता झालेल्या चर्चेने पूर्णतः मिटलेले आहेत. त्यामुळे आता भाजपचे सर्व कार्यकर्ते एकदिलाने भाजपचे उमेदवार दीपक पटवर्धन यांना निवडून आणण्यासाठी झटणार असल्याची माहिती माने यांनी यावेळी दिली. आता अंतर्गत मतभेद या विषयावर पूर्णपणे पडदा पडला असून दीपक पटवर्धन यांच्या रूपाने एक चांगले नेतृत्व आता शहरवासियांना लाभले आहे. शिवसेनेने ही निवडणूक लादली असल्याचा आरोपही माने यांनी यावेळी केला. आपण काही केले तरी चालते असा काही लोकांचा समज आहे. त्याला जनता योग्य ते उत्तर देईल असेही माने यांनी सांगितले. यापूर्वी भाजप-सेना युती होती म्हणून आम्ही विधानसभा व लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा प्रचार केला परंतु आता पक्षाच्या नेतृत्वाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा आदेश दिल्यानंतर भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आता नगराध्यक्ष निवडणुकीत कोणतेही मतभेद न बाळगता एकदिलाने भाजपचे सर्व कार्यकर्ते शतप्रतिशत भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी झटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button