
22 डिसेंबरला गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई जिल्हास्तरीय अभंग गायन स्पर्धा
गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई स्मृती जिल्हास्तरीय संतरचित अभंग गायन स्पर्धा येत्या 22 डिसेंबरला होणार आहे. स्वराभिषेक-रत्नागिरी आणि प.पू. गगनगिरी महाराज भक्त मंडळ, रत्नागिरी यांनी स्पर्धेचे आयोजन केले असून ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ फेम ‘समर्थकृपा प्रॉडक्शन’चे याकरिता प्रायोजकत्व लाभले आहे.
स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. जिल्ह्यातील 12 ते 20 वयोगटाकरिता ही स्पर्धा असून 22 डिसेंबरला सकाळी 10 वाजता प.पू. गगनगिरी महाराज आश्रमातील रंगमंचावर होईल. स्पर्धेतील सहभागाकरिता स्पर्धकाने कोणत्याही अभंगाचा किमान 2 मिनिटांचा एक व्हिडिओ महेंद्र पाटणकर (9404331802), केदार लिंगायत (8007593709), मंगेश मोरे (9011918282), मंगेश चव्हाण (9637692554) किंवा ईशानी पाटणकर (7720009410) यांच्याकडे व्हॉटस्अपवर पाठवायचा आहे. त्यानंतर अंतिम स्पर्धेतील सहभाग कळवला जाईल. अंतिम स्पर्धेत संतरचित अभंग सादर करायचा आहे. त्याकरिता कोणत्याही दोन अभंगांची नावे अंतिम स्पर्धेतील सहभाग निश्चितीनंतर द्यायची आहेत. स्पर्धेकरिता तबला, पखवाज, हार्मोनियम, तालवाद्य व इलेक्ट्रॉनिक तानपुरा व वादक साथीदार आयोजकांतर्फे देण्यात येतील. इच्छुकांना स्वखर्चाने आपले साथीदार आणता येणार आहेत.
अंतिम प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्यांसह दोन उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील. दोन हजार, दीड हजार, एक हजार व उत्तेजनार्थ 500 रुपयांची रोख पारितोषिके, तसेच चषक व प्रमाणपत्र विजेत्यांना दिले जाणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाईल. प्रवेश विनामूल्य आहे.