
महिलांच्या श्रमदानातून पद्मावती नदीत तीन बंधारे
ग्रामीण भागात एखाद्या शासकीय उपक्रमासाठी महिलांचे संघटन करणे जिकिरीचे ठरते. मात्र काही गावात विविध समाजोपयोगी उपक्रमास महिलांना साद घालताच त्या उत्साहाने सहभागी होतात. चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेत तीन बंधारे घातले आहेत. पडीक चिरा, माती व वाळूचा वापर करीत महिलांनी एकजुटीने बंधार्याची मजबूत बांधणी करून लाखो लिटर पाणीसाठा केला.
www.konkantoday.com