
उच्च न्यायालयात जामीन नाकारल्याने अखेर भोसले दांपत्य पोलिसांना शरण
रत्नागिरीतील पोलीस कॉन्स्टेबल सागर जाधव यांच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पौर्णिमा भोसले व तिचा पती मानसिंग भोसले हे दाम्पत्य अखेर शहर पोलिसांना शरण आले आहे या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्याने जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता परंतु जिल्हा न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला होता त्यानंतर हायकोर्टात अपील करणेत आले होते परंतु तेथेही हा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता .
www.konkantoday.com