मंडणगडातील जिद्दी ट्रेकींग ग्रुपने कलावंतीण दुर्ग केला सर
काळ्या कातळावरून कोरलेल्या पायर्यांवरून तीव्र चढ-उताराचा २३०० फूट उंचीचा टोकदार सुळका, श्वास रोखायला लावणारा कलावंतीण दुर्ग चढून मंडगड तालुक्यातील पाच जिद्दी शिखरावर पोहोचले. जिद्दी ट्रेकींग ग्रुपच्या वतीने २५ नोव्हेंबरला ट्रेकींगची तिसरी मोहीम यशस्वी झाली.
संतोष चौगुले, अमित चिले, सुहैल दाभोळकर, आकाश पाडलेकर, निखिल पिंपळे व जिल्ह्यातील अन्य अनेक जिद्दी गिर्यारोहक या मोहिमेत सहभागी झाले होते.
www.konkantoday.com